बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी तुझ्यावेळी त्यांनी गच्च डोळे मिटले क्रातींकारी म्हणून तुला दुर लोटले अहिंसेचे ते पुतळे तेव्हां पुरते झोपले अफ़झलसाठी मात्र तत्व सोडुन नाचले तुही तेच केल होत जे त्याने केल तु देशासाठी केल त्या देश द्रोह्यांसाठी तेव्हां तुला मिळाली फ़ाशीची क्षिशा त्याच्यासाठी मागतात माफ़ीची दिक्षा. म्हणे बेकार तुझा आत्मा होता देशात तो एकच महात्मा होता असा जागतेपणे डोळे झाकणारा तोच ना आमचा पिता होता. त्याचेच भक्त आज असे वागतात त्याच्या विचारांना मातीत पुरतात तुझ्या बलिदानाला दिलि मुठ माती अफ़झलची करणी म्हणे एक चुक होती. माझ्यासाठी तु एकच महात्मा किचांळतोय क्रांतीचा प्रत्येक आत्मा अहींसेच्या पुतळ्यांनीच केला आहे या देशात क्रांतीच्या विचारांचा खात्मा. तुझा इतिहासा अर्धा पानात लिहिला या देशात क्रांती विरांचा इतिहास हरवला कोणाला कळाल नाही क्रांतीच बलीदान तोच अहीसेचा धडा ह्या पुस्तकांनी गिरवला. बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी
No comments:
Post a Comment