तुझ्या अस्तकाल कथेच्या पानांनी घर भरुन गेले आहे… अंधारभरल्या खिडकितुन वाहणा-या वा-यावर, अखेरदर्शी स्मरणांच्या धुळीचे टिंब, त्याआधीच्या काहि ओळी… ..खोडुन चुकलेले…तर काही चुकुन खोडलेले संदर्भ तेव्हाचे… कपाच्या तळाशी गोठलेले कॉफ़ीचे थेंब तुझा घट्ट मिठिचा पाउस नंतरच..निळसर डोळ्यांच आभाळ हे लिहिताना..संपलेली शाई भरभर सरल्या दिवसांच कॅलेंडर त्या भान विसरल्या क्षणांची थरथर अन…., काहि अर्धवट आकृत्या उडत आहेत वा-यावर… घर भरुन गेलंय वा-याने तेवढा…पदर सावर घर वाहुन जाईल वा-याने हा वारा थांबव.. … .. . कथा संपेल…
No comments:
Post a Comment