Tuesday 2 August 2011

सांगता येत नव्हतं माझं प्रेम

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम

मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम


सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम

वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेम
थांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेम
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम


No comments:

Post a Comment