आयुष्य होते उरलो नभात सा-याच राती सरलो नभात. तो मीच तारा नभि तूटलेला तूझ्याच साठी तुटलो नभात. तो चंद्र तुला फ़सवून गेला. असाच मीही फ़सलो नभात. हो आज तीही विसरून गेली पाहून वाटा बसलो नभात. ती एक आशा मज चादण्यांची मी चादण्यांशी हरलो नभात. दिला कधी ना नियतीस दोष मी नीवडूंग जगलो नभात.
No comments:
Post a Comment