आजची पोरं म्हणे प्रेम करतात एकीची आठवण काढत दुसरीला भेटतात सोबत फिरताना एकीच्या विचार मनी नेहेमी वेळेचा नाहीना येणार ती वेळेआधी हिच्या जाण्याच्या हातात हात घेवून एकीचा स्पर्श अनुभवतात दुसरीचा डोकं ठेवून एकीच्या खांद्यावर स्वप्नात रमतात दुसरीच्या हॉटेलात बसून order देतांना विचारतात समोर बसलेलीला मात्र मनात करत असतात पाढा सोबत नसलेलीच्या आवडी निवडींचा अशाच द्वैतात असतात ती कायम एक रुसली कि मग दुसरीला बनवतात रागाचं कारण अशेच चालू राहते त्यांचे एकमेवाद्वितीय प्रेम मग होते भान जेव्हा येते लग्नाची वेळ हिला हो म्हणालो तर तिचं काय करू? आणि तिला हो म्हणालो तर हिचं काय करू? एकीच्या हाती देतात फुटाण्याच्या अक्षदा आणि मग काय दुसरी कडून त्यांनाच मिळतात फुटाण्याच्या अक्षदा….. मग काय करणार जातात शेवटी आई-बाबांपाशी लाग्नलावून द्यात म्हणतात तुमच्या आवडीच्या मुलीशी मग बदलतात प्रेमाचे संदर्भ
No comments:
Post a Comment