Monday 29 August 2011

का वागतात या मुली अशा

आजकालच्या ह्या मुली

आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या

बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात

गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट

सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला

यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात

पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले

सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही

म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे
"ladies first ladies first"
Not in salawar
but only in mini skirt

.एका झाडाखाली....दोन मुली

मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"
मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून
असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा
खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात
वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.

(
त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना
झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows,
मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी.

*** बायकांचे नखरे ***

बायकांचे नखरे...जे तुम्ही सांगणार..ते.
नवरा: आज जेवायला काय बनवशील?
बायको: जे तुम्ही सांगणार ते.
नवरा: वरण भात बनव
बायको: कालच तर बनवलं होतं ते
नवरा: मग भाजी आणि चपाती बनव
बायको: मुलं नाही खात ते
नवरा: मग छोले आणि पुरी बनव
बायको: मला ते जड वाटतंय
नवरा: अंड्याची भुर्जी बनव
बायको: आज गुरुवार आहे
नवरा: पराठे?
बायको: रात्री कोणी पराठे खत का?
नवरा: चल हॉटेल मधूनच मागउ
बायको: रोज रोज हॉटेलचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको: दही नाही आता
नवरा: इडली-सांबर?
बायको: त्यात वेळ लागेल आता, आधीच सांगायचं नाही का
नवरा: चल ठीक आहे म्यागीच बनव, त्यात वेळ नाही लागत
बायको: ते काही जेवण आहे?
नवरा: मग आता काय बनवशील?
बायको: जे तुम्ही सांगणार..ते...

सुंदर मुली भाव खातात...

आजची पोरं म्हणे प्रेम करतात

आजची पोरं म्हणे प्रेम करतात
एकीची आठवण काढत
दुसरीला भेटतात
सोबत फिरताना एकीच्या
विचार मनी नेहेमी वेळेचा
नाहीना येणार ती
वेळेआधी हिच्या जाण्याच्या
हातात हात घेवून एकीचा
स्पर्श अनुभवतात दुसरीचा
डोकं ठेवून एकीच्या खांद्यावर
स्वप्नात रमतात दुसरीच्या
हॉटेलात बसून order देतांना
विचारतात समोर बसलेलीला
मात्र मनात करत असतात
पाढा सोबत नसलेलीच्या
आवडी निवडींचा
अशाच द्वैतात असतात ती कायम
एक रुसली कि मग
दुसरीला बनवतात रागाचं कारण
अशेच चालू राहते त्यांचे
एकमेवाद्वितीय प्रेम
मग होते भान जेव्हा येते लग्नाची वेळ
हिला हो म्हणालो तर तिचं काय करू?
आणि तिला हो म्हणालो तर हिचं काय करू?
एकीच्या हाती देतात फुटाण्याच्या अक्षदा
आणि मग काय दुसरी कडून त्यांनाच मिळतात
फुटाण्याच्या अक्षदा…..
मग काय करणार
जातात शेवटी आई-बाबांपाशी
लाग्नलावून द्यात म्हणतात
तुमच्या आवडीच्या मुलीशी
मग बदलतात प्रेमाचे संदर्भ

 

Wednesday 24 August 2011

बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र

प्रिय अण्णा यांसी,


जय महाराष्ट्र !


एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या सामाजिक व जलसंधारणविषयक कामाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

सध्या आपण दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराच्या रावणाविरूद्ध जबरदस्त युद्ध पुकारले आहे. रामलीला मैदान म्हणजे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. उपोषणाच्या मार्गाने छेडलेल्या युद्धास देशभरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण अण्णामय झाले आहे.

आपल्या उपोषणाचा आठवा दिवस सुरू झाला आहे व आपली प्रकृती खालावल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण प्राण पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या प्राणावर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या उपोषणाने देश जागा झालाच आहे व सरकारही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या प्रकृतीक़डे पाहून उपोषण सोडा ! उपोषण सोडले तरी आंदोलन सुरूच राहील. आपल्या उपोषण समाप्तीनंतर आपले सहकारी केजरीवाल, बेदी, सिसोदिया वगैरे मंडळींना उपोषणास बसू द्या व आंदोलन चालू राहू द्या.

देशात राजकीय स्वैराचार आणि भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की, शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस महाराष्ट्राच्या नात्याने विनंती करतो आहे की, उपोषण आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा राजकीय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील लढ्यासाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम !

आपला नम्र

(बाळ ठाकरे)

शिवसेनाप्रमुख

 

अण्णांची आतापर्यंतची सोळा उपोषणं

समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासाठी उपोषण ही काही नवीन बाब नाही, अण्णा ज्या ज्या वेळी उपोषणाला बसले तेव्हा तेव्हा सरकारला अण्णा समोर झुकावं लागलं. हीच आहे त्यांची अढळ अशी ताकद आणि नैतिकतेचा करिष्मा.



१९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषण केली आहेत. प्रत्येकवेळी सरकारला त्यांच्या समोर नमतं घ्यावं लागलंय, मागण्या मान्य कराव्या लागल्याय. अण्णाची १६ पैकी १३ उपोषणं ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणं केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.

यातील १५ आणि १६वं उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचं, अण्णांनी आतापर्यत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केलं आहे. अण्णाच्या या उपोषण आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिका-यांवर कारवाई करावी लागलीय तर ६ मंत्र्यांना पदं गमवावी लागली आहेत.

अण्णानी पहिलं यशस्वी उपोषण १९८० साली केलं, एक दिवसाचं हे उपोषण अण्णांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं. राळेगणसिध्दीत माध्यमिक शाळा सुरू करण्यास शासन मान्यता मिळावी म्हणून अण्णांनी हे उपोषण पुकारलं होतं, अण्णांच्या उपोषणानं एका दिवसातचं सरकारी यंत्रणेला झुकवलं, अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सामजिक जीवनातील ही पहिली वेळ होती, जेव्हा सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना मोठ यश मिळवता आलं होतं.

अण्णांचे दुसरं यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ साली त्यांच्या गावात म्हणजे राळेगणसिध्दीत झालं, ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकाऱ्यांची टाळाटाल आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलन ही यशस्वी झालं, दोषी अधिका-य़ांवर कारवाई करण्यात आली, ग्राम विकास योजनांच्या मंजुरीचं जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिका-यांनी लिखित आश्वासन दिलं.

अण्णाचं तिसरं उपोषण २० ते २४ फेब्रुवारी १९८९ या काळात झालं. हे उपोषण शेतक-यांसाठी होतं. गावाला पाणी पुरवठा होत नाही, या विरोधात होतं, सरकार पुन्हा झुकलं ४ कोटी रुपये मान्य करत, सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.

आता वेळ होती चौथ्या आंदोलनाची ९ महिन्यात पुन्हा अण्णांना पुकारावं लागलं, तारीख होती २० ते २८ नोव्हेबर, प्रश्न शेतक-यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी, यावेळी मात्र सरकार झुकता झुकेना उपोषण ९ दिवसं चाललं. अखेरीस सरकारवर दबाव वाढला, सरकार झुकलं तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिलं, वीज पुरवढ्यासाठी २५० केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात आण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.

सन १९९४ साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला, सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतचं उत्तर मिळत नव्हतं. अण्णाचं हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिलं उपोषण.

महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी या उपोषणाला सुरवात झाली, ६ दिवस हे उपोषण चाललं, १४ भ्रष्ट अधिका-यांपैकी ४ अधिका-यांना सरकारनं निलंबित केलं. दहा अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करु असं आश्वासन दिलं.


अण्णांनी पुढील उपोषण म्हणजे ६ वं उपोषण १९९६ साली केलं, त्यातही त्यांना यश आलं. राज्यातील शिवसेना भाजपा सरकार मधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात. २० नोव्हेंबर १९९६ रोजी त्यांनी उपोषणाला सुरवात केली, मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती, त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण १२ दिवसं चाललं. आतापर्यंतचं अण्णाचं हे सर्वात मोठं उपोषण होतं. सराकार झुकलं एका स्वच्छ प्रतिमेच्या समाजसेवकासमोर. ३ डिसेंबर १९९६ ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवढा मंत्री शशिकांत सुतार.

अण्णाच्या उपोषणाच्या अस्त्राला आता आणखी धार चढली होती, अण्णांनी १९९७ साली यावेळी ही युती सरकारमधील भ्रष्टाचाराचाचं मुद्दा होता. अण्णांच्या निशाण्यावर होते यावेळी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप, उपोषण १० दिवस चाललं, अण्णाचं स्वच्छ चारित्र्याचं अधिष्ठान पुन्हा सराकारवर भारी पडलं. घोलपाना राजीनामा द्यावा लागला तर १८ अधिका-यांना निलंबित करण्यात आलं .

अण्णानी थेट मंत्र्यांन विरोधात सुरू केलेली लढाई साहजिकच अडचणींना आमंत्रण देणारी होती. घोलप न्यायालयात गेले होते, न्यायालयात अण्णा घोलपावरील आरोप सिध्द करु शकले नाहीत आणि अब्रुनुकसानीच्या आरोपात अण्णांना ३ महिन्याचा कारवास झाला. अण्णानी या विरोधात १० दिवसं उपोषण केलं. ९ ते १८ आगस्ट १९९९ रोजी अण्णांनी हे उपोषण केलं. दरम्यान १९९९ साली झालेल्या विधासभेच्या निवडणुकांमधे युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं.


उपोषणाची ९ वी वेळं

सन २००३ - ९ दिवसाचं उपोषण राज्यात आघाडीचं सरकार होतं. हे उपोषण माहितीच्या अधिकारासाठीचं होतं. ९ ओगस्ट, क्रांती दिनाच्या दिवशी या आंदोलनाला सुरवात झाली. सरकारनं माहितीचा अधिकार दिला, अण्णाचं उपोषण यशस्वी झालं .


माहितीचा अधिकार तर कायद्यानं मिळाला मात्र तो अधिका-या लालफितीत अडकला, सरकारी अधिकारी अडवणूक करु लागले. अण्णांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलं. १० वं उपोषण मागण्या होत्या माहिती अधिकाराची योग्य अमलबजावणी करणं. दफ्तर दिरंगाईवर लगाम लावणं आणि बदलीचा कायदा आणणं. ९ फेब्रुवारी २००४ साली सुरू झालेलं हे ९ दिवसं हे उपोषण चाललं. सरकारनं अण्णाच्या मागण्या मान्य केल्या, बदल्यात कायदा आला, दफ्तर दिरंगाईचा कायदा आला .

अण्णांचं ११ वं उपोषण १० व्या उपोषणाचं पुढचं पाउलं होतं. माहिती अधिकाराच्या माध्यमातून अण्णांना समाजात जागृकता आणायची होती. केंद्र सरकारनं माहिती अधिकाराच्या कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला होता. त्यामुळं महिती अधिकाराचा कायदा कमकुवत होणार होता अण्णानी आळंदीला ९ ओगस्ट रोजी उपोषणाला सुरवात, अण्णांना माहिती अधिकार कायद्यातल्या सुधारणा मान्य नव्हत्या. ११ दिवसं हे उपोषण चाललं. सरकारनं मागणी मान्य केली. अण्णांच्या उपोषणाला मिळालेलं हे ११ वं यश.

साल २००६ राळेगणसिध्दी इथं अण्णांच्या १२ व्या उपोषणाला सुरवात झाली, हे उपोषण माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगान दिलेल्या अहवालाच्या अंमल बजावणीसाठी होतं. सरकारनं दोषी मंत्र्यावर कारवाई करावी या मागणीसाठी होतं. पी बी सावंतानी अण्णांसह ३ मंत्र्यांना दोषी ठरवलं होतं, मात्र सरकारनं या मंत्र्याविरोधात कोणतीही कारवाई होत नव्हती. सुरेश जैन , पद्मसिंह पाटील आणि नवाब मालिक यांना मंत्रीपद गमवावी लागली होती, मात्र न्यायालयीन कारवाई या मंत्र्यावर होत नव्हती सरकारनं अण्णांना कारवाईचं आश्वासन दिलं. अण्णांनी उपोषण मागे घेतलं.

अण्णाच्या १२ व्या उपोषणानं भ्रष्टमंत्र्यावर कारवाईचं आश्वासन तर मिळालं, मात्र त्यानंतर अण्णांना जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली, ही सुपारी खासदार पद्मसिंह पाटील यांनी दिली असा अण्णाचा दावा होता. पद्मसिंह पाटलांवर कारवाई होत नव्हती, अखेरीस सरकारनं गुन्हा नोंदवला, पद्मसिंह पाटलांना कैदेत जावं लागलं. अण्णाच्या सत्याग्रहाला, उपोषणाला मिळालेलं १३ वं यश होतं.

साल २०१० अण्णांचं १४ वं उपोषण केलं ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचारा विरोधात, सहकार कायद्यात अमुलाग्र बदल करावे या मागणीसाठी. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झालं. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळालं .

आता वेळ होती अण्णाच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देउनही सरकार जागं होत नव्हतं, जन लोकपाल कायद्याच्या मंजुरी साठी हे उपोषण होतं, भ्रष्टाचाराच्या विरोधातलं हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचारानं पोळलेल्या जनसमान्यांनी अण्णांना उर्स्फूत पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झालं. सरकारवर वाढत्या दबावानं सरकारनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिविल सोसायटीच्या ५ सदस्यासह ज्वाईंट ड्राफ्ट कमिटी स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतलं.

सध्या रामलिला मैदानात सुरू आहे ते अण्णांचं १६ वं उपोषण....

निलेश खरे-स्टार माझा

 

तुम्हाला जर राजकारणात करियर करायचे असेल

कधी असेही जगून बघा.....

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"
किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

सोहम्

 

मी आहे हा असा आहे,..

फुलले रे क्षण माझे फुलले रे

फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफूले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे

प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे....

अनोळखीच

प्रेम हे असच असत

प्रेम आणि वेडेपणा...

प्रेम आणि वेडेपणा...

खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडेतिकडे फिरत होते. काय करावे हे नकळल्याने कंटाळले होते.

एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते'ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली,"आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्यामागे लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला.......एक, दोन, तीन..............

वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी'नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ'एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता......७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र कुठे लपावयाचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्यालायाचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच...९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा'ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला."मी येतोय! मी येतोय!"
'वेडेपणा'न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्याएवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा'ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एका पाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा'ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा'ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा'ने एक लाकडाचा धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्याफटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वार केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?

प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."

तेव्हापासूनप्रेम आंधळ झालं आणि वेडेपणात्याचा नेहमीचा सोबती झाला.

मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

तू उशीरा येण्याची

तू उशीरा येण्याची आता
सख्या सवय झाली आहे
तरी ही टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती
नव्यानेच लिहिलेले काही क्षण
मन पटलावर पुन्हा एकदा
थैमान घालू लागले..

अन विचारांच्या वादळात
अनेक अनुत्तरीत प्रश्न
पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर
अस्त व्यस्त पणे धडकू लागले

का रे सख्या असा करतोस ?
माझाच असताना तू
प्रेम विसरुन फ़क्त क्षणीक सुखांसाठी
मज अवेळी बिलगतोस

रात्र तुझी माझे सर्वस्व ही तुझेच
पण फ़क्त शरीरा साठीच
तुझे काही क्षण मजपाशी असणे
मला आता बोचते रे

तरी या स्त्रीचे हे विडंबन
सहन करीत मी
तोंडावर ताबा अन
दारावर डोळे ठेवून
पुन्हा तुझीच वाट पहात आहे
पुन्हा तुझीच वाट पहात आहे

 

 

Tuesday 23 August 2011

तू उशीरा येण्याची

तू उशीरा येण्याची आता
सख्या सवय झाली आहे
तरी ही टेबलावर जेवण
अन दारावर डोळे ठेवून
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे

अश्यातच ... आयुष्याच्या पानावरती
नव्यानेच लिहिलेले काही क्षण
मन पटलावर पुन्हा एकदा
थैमान घालू लागले..

अन विचारांच्या वादळात
अनेक अनुत्तरीत प्रश्न
पुन्हा एकदा ह्रदयाच्या दारावर
अस्त व्यस्त पणे धडकू लागले

का रे सख्या असा करतोस ?
माझाच असताना तू
प्रेम विसरुन फ़क्त क्षणीक सुखांसाठी
मज अवेळी बिलगतोस

रात्र तुझी , माझे सर्वस्व ही तुझेच
पण फ़क्त शरीरा साठीच
तुझे काही क्षण मजपाशी असणे
मला आता बोचते रे

तरी या स्त्रीचे हे विडंबन
सहन करीत मी
तोंडावर ताबा अन
दारावर डोळे ठेवून
पुन्हा तुझीच वाट पहात आहे
पुन्हा तुझीच वाट पहात आहे

 

जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे

जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे

निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे

घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे

माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे

सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे

रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे

छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे

स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्‍यात अंतर्धान अस्तित्व माझे

 

निशिगंधीत चांदणं

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे
असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे

आता करुनी मुर्खात गणना माझी
त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ?
पुरुषात रुपांतर करुनी झाले
सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले

सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम
हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ?
धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी
रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ?

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा
सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती

काळ येता जेंव्हा, अमरत्वाची ग्वाही
सामोरा उभा सज्ज मृत्युच्या दारी
बोलशील तेंव्हा तू, काय अशी मोठी बात भारी
त्यागलेला हा शुल्लक जीव .. पाहतेस का कधी ?

खडतर आयुष्य.. आयुष्याची नाती
नोंद तुझ्या मनावरी.. आठवतेस का कधी
मी गेल्यावर पत्नीच्या कपाळावरील
गोंदलेले ओसाड रान .. पाहशील का कधी
सांग वाहिलेल्या शुद्र शवाची
येव्हडी इच्छा जाणशील का कधी?

आशा कोरडी जाणीवतेची
ना तू जाणलेली ती ही कधी
बेभानलेले माझे तेजरुप पाहताना
मरणाची सदैव काळझेप.. पाहतेस का कधी ?

नाव हि नसते ठावूक, आपुल्या तान्ह्या बाळाचे
बर्फावर विरघळणारे पितृत्व असे .. पाहतेस का कधी ?
ना सापडे तडफड पित्याच्या अतिंम श्वासांची
नाविक गस्त असे जरी विशाल समुद्रावरी

बुलंद आवाज ना माझा एकट्याच्या
मीच तो उंच उभा सदैव रक्षणात तुझ्या
उन्हा पावसात तू मुक्त बागडताना
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?

मायेच्या रक्षणात सदैव आपण
हसण्याचे हेच कारण पुरे आयुष्यभर
अन तू बोलतेस जगाशी .. चमकतो भारत आहे
देवूनी धोका धारातीर्थ जवानांच्या आत्म्यास
सांग चकाकणारे सोंग हे .. तू कधी पर्यंत वठवणार आहे ?

तुच्छतेने लिहिले कोणी, अस्तित्व येथले
उपहासित हे माझे जगणे .. पाहतेस का कधी ?
उभारुन माझ्या जागी, बोलशील का कधी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?

ध्वज उंच दिमाखात फडकवण्यास तुझा
अजुनही जोखीम प्राणांची घेत आहे
प्रश्न परि अनुउत्तरीत माझे ..
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?