Tuesday 23 August 2011

जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे

जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे

निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे

घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे

माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे

सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे

रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे

छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे

स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्‍यात अंतर्धान अस्तित्व माझे

 

No comments:

Post a Comment