Tuesday 23 August 2011

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?
लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे
असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे

आता करुनी मुर्खात गणना माझी
त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ?
पुरुषात रुपांतर करुनी झाले
सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले

सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम
हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ?
धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी
रक्त सांडलेले तुझ्या पदरी ... पाहतेस का कधी ?

माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?
कोठे कसाही असो, ना विचार तेंव्हा वेगळा
सज्ज कायम रक्षणास, वेळ येताच प्राणांची आहुती

काळ येता जेंव्हा, अमरत्वाची ग्वाही
सामोरा उभा सज्ज मृत्युच्या दारी
बोलशील तेंव्हा तू, काय अशी मोठी बात भारी
त्यागलेला हा शुल्लक जीव .. पाहतेस का कधी ?

खडतर आयुष्य.. आयुष्याची नाती
नोंद तुझ्या मनावरी.. आठवतेस का कधी
मी गेल्यावर पत्नीच्या कपाळावरील
गोंदलेले ओसाड रान .. पाहशील का कधी
सांग वाहिलेल्या शुद्र शवाची
येव्हडी इच्छा जाणशील का कधी?

आशा कोरडी जाणीवतेची
ना तू जाणलेली ती ही कधी
बेभानलेले माझे तेजरुप पाहताना
मरणाची सदैव काळझेप.. पाहतेस का कधी ?

नाव हि नसते ठावूक, आपुल्या तान्ह्या बाळाचे
बर्फावर विरघळणारे पितृत्व असे .. पाहतेस का कधी ?
ना सापडे तडफड पित्याच्या अतिंम श्वासांची
नाविक गस्त असे जरी विशाल समुद्रावरी

बुलंद आवाज ना माझा एकट्याच्या
मीच तो उंच उभा सदैव रक्षणात तुझ्या
उन्हा पावसात तू मुक्त बागडताना
हा खेळ चाले जीवनी, पाहतेस का कधी ?

मायेच्या रक्षणात सदैव आपण
हसण्याचे हेच कारण पुरे आयुष्यभर
अन तू बोलतेस जगाशी .. चमकतो भारत आहे
देवूनी धोका धारातीर्थ जवानांच्या आत्म्यास
सांग चकाकणारे सोंग हे .. तू कधी पर्यंत वठवणार आहे ?

तुच्छतेने लिहिले कोणी, अस्तित्व येथले
उपहासित हे माझे जगणे .. पाहतेस का कधी ?
उभारुन माझ्या जागी, बोलशील का कधी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?

ध्वज उंच दिमाखात फडकवण्यास तुझा
अजुनही जोखीम प्राणांची घेत आहे
प्रश्न परि अनुउत्तरीत माझे ..
माये का करु अजुनही सेवा तुझी ?
हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ?

 

No comments:

Post a Comment