आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी बरसून गेलो आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जनम्न्यास पुन्श:छ नदीसागरात मग देह माझा विलीन झाला
No comments:
Post a Comment