आत्ताच डोळ्यात गळून गेली जी आठवांना विसरून गेली. होते अश्रू नीकट काळजाच्या डोळ्यात सारे भिजवून गेली. मी जागुन आयुष्य काढलेले ही रात्र झोपेत गिळून गेली. होतो मि तीथेच समोर तीच्या ती मान मागे वळवून गेली. हा दोष मी आज कुणास द्यावा दोषी मला ती ठरवून गेली. शब्दास आता रडु आवरेना काव्यास माझ्या रडवून गेली. झालो मि आता निवडूंग वेडा तीही गुलाबात दगूंन गेली.
No comments:
Post a Comment