सागरी मीठीत हळुच शिरले किनारे आसवे गाळून परत फ़िरले किनारे. आयुष्यात एकरुप असुन सागराशी दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे. मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे. वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा सागरा घेऊन कुशित निजले किनारे. साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत संपण्याआधीच जिव हरले किनारे. आज येऊदे प्रलय अचल मी उरेन ठोकुन छाती मग गडगडले कीनारे. पापण्यांती घेउन जखम जगी जगलो निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे.
No comments:
Post a Comment