Thursday 8 September 2011

* ???? Facebook Status *

Blog Entry

http://multiply.com/mu/onlyswapna/image/iG-p3KS1vwzdY6x-t8F8JQ/photos/1M/300x300/18/WOMAN.JPG?et=owb25MacuyFpXgC2Wip%2B4g&nmid=0प्रस्तावना : फेसबुक ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा Status म्हणजेच तुमच्या मनात जे काही चालू आहे त्याविषयी थोडक्यात लिहू शकता.पण ह्या status ला ४२० शब्दंमर्यादा आहे.त्यामुळे त्यात मावेल इतकंच तुम्ही लिहू शकता.पण,कवीमनाला हे शब्दंमर्यादेचं बंधन कसं पटेल ?
त्यावरच ही कविता..

**
माझा Facebook Status **

Facebook Status
ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे
आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard
बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले

Status
सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..
Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०

कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?

Facebook
च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली
प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही

म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले
तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status
मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते

तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते

माझे Status तरंगते हिमनग असते..



* ?????? *

प्रस्तावना : जग कितीही आधुनिक झाले तरी आजही स्वत:च्या हिंमतीवर,जबाबदारीने स्त्रीने घरचा उंबरठा ओलांडणे खुप मोठी गोष्ट आहे.ह्या अर्थाने की,घराचा उंबरठा हा नेहमी सुरक्षित समजला जातो.आणि तिथेच जर त्या घरातल्या स्त्रीची घुसमट होत असेल तर नवीन पाऊल
उचलण्यासाठी प्रस्थापित परिस्थितीतून बाहेर पडून बाहेरच्या जगातली नवीन आव्हानं स्विकारायला तयार होणे ही तिच्यासाठी खुप मोठी गोष्ट असते.अशाच परिस्थितीतून जाणार्‍या स्त्रीची ही कविता.


**
उंबरठा **


भय अनामिक असे आज दाटून आले..
मेघ अभावित जसे आज दाटून आले..

ओलांडू कशी मी उंबरठा ?

किलकिले दार उघडता
सुख देत हाकारे बाहेरुन आले..

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

घुसमट सोसवेना मनीची
तडफड साहवेना कधीची
कोंडू कशी वेदनेला ?
मारु कशी जाणीवेला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

आहे,जग भयाण आहे
आहे,मीही तयार आहे
माघार घेऊ कशाला ?
दार लावू कशाला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

* ?? ??? ????? ????? *

प्रस्तावना : ती त्याच्या फोनची वाट पहाते आहे.पण,काही कारणाने त्याचा फोन येत नाहीये.त्या दरम्यानची तिची अस्वस्थता आणि सोबतीला जीवघेणा पाऊस.


*
तू कॉल करणार होतास *


संध्याकाळ होतेय
वादळ घोंघावतंय
मी गच्चीत उभी
मृदगंध नकोसा वाटतोय
त्या दिवशी महत्वाचं बोलणं अर्धच राहिलं..
तू कॉल करणार होतास..

भरलेलं आभाळ गप्पं कोसळतंय
पाकोळ्या भिरभिरताहेत
माझं लक्ष वारंवार फोनकडे
गार वारा झोंबतोय
बिझी असशील पण तरीही..
तू कॉल करणार होतास..

शेवटचा किरण धरतीला भेटून चाललाय
पक्षी घरट्याकडे निघालेत
घरांमध्ये दिवे लागलेत
ओला पाऊस जाळतोय
मीच कॉल केला असता पण..
तू कॉल करणार होतास..

झाडांमध्ये रात्र विसावलीय
विजा चमकताहेत
मी अजूनही गच्चीवरच
टिटवीचा आवाज छळतोय
तुला ठाऊक आहे,मी काळजी करते..
तू कॉल करणार होतास..

सगळीकडे अंधार झालाय अन चिखलही
एकेक पायरी उतरणं जड जातंय
स्वप्नात तरी भेटशील ?
ठीक आहे,आज नाही तर पुन्हा कधीतरी..
तू कॉल करणार होतास..
पण,कदाचित डेड असेल..फोन....की....आपलं नातं ?

* ?????? ??? ?? ????? ?? *

प्रस्तावना :ती त्याच्यापासून दूर निघून गेली पण तिच्या आठवणीच आता नायकाला सोबत देत आहेत.कवितेच्या नायकाचे ह्रद्य मनोगत.


*
निघूनी जरी तू गेलीस ना *


निघूनी जरी तू गेलीस ना
मन हळवे
मन हळवे
तुज आठवणे सोडे ना
निघूनी जरी तू गेलीस ना

फुलवला जिथे तू मोगरा
सुगंधिले कधी ज्या कळ्या
गंध अजूनी देतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

गायला जिथे तू मारवा
छेडल्या कधी ज्या तारा
गीत अजूनी गातात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

स्पर्शिले जिथे तू देहा
चुंबिले कधी ज्या ओठा
थर्रथर अजूनी होतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

घेतला जिथे तू विसावा
मळल्या कधी ज्या वाटा
वाट अजूनी बघतात ना
निघूनी जरी तू गेलीस ना

उरल्या मनी आठव तुझ्या
त्याच आता सखी माझ्या
संग अशी करतात ना
जशी..
निघूनी कधी तू गेलीस ना

निघूनी जरी तू गेलीस ना..

????? - The Kiss

Wednesday 7 September 2011

ती होती तेव्हा

____वारा____

तु हसलीस तेव्हा

आभाळाचे कोरे कागद, मी तसेच तयांना पाठविले…!!!

असे विसरले शब्द मजला, जसे ते मजला आठविले
आभाळाचे कोरे कागद, मी तसेच तयांना पाठविले…!!!

असताल तेथुनी द्या लिहुनच,पाउस मजला यारहो
मी अंगणा सांगुन आलोच, अन 'ती'लाही, तैयार हो…!!!

वीज लख्ख-थक्क वारा, ओघळ पाणी लिहा तयातच
ओलाव्याचे उदास रडणे नको अताशा नको उगाचच…!!!

ती गेल्याचे वाटत नाही, अन नाही दुखणे कसले काही
ती सुखात गेली हेच मिळाले, अजुन काही उरले नाही…!!!

फ़क्त विखुरल्या रांगोळीची, ऒळ तेवढी सजवुन द्या
त्याआधी पण पावसात ही, माती जरा भिजवुन घ्या…!!!

वाहतील मग रंग सारेच, तो सफ़ेदही पसरेल थोडा
रंग राहुद्या तसेच वाहते, तो एकटाच पाण्याने खोडा…!!!

तुमच्याविना येईल तसाही, या डॊळ्यानाच पाउस माझा
मग ती म्हणेल आरोपाने, हा मी नसल्याचा गाजावाजा…!!!

म्हणुन सांगतो तिला आठवत, उगाच रडवे लिहु नका रे
उश:प ठरावा तिचा शाप हा, या शब्दांनो परत फ़िरा रे…!!!