तुझ्या डोळ्यात निळ आभाळ दिसत मला
तो उडणारा पक्षी, त्याच्या डोळ्यात साठलेल ते निळ आभाळ,
उडण्यासाठी आतुर झालेले त्याचे ते पंख
आणि एक श्वास रोखून त्याने घेतलेली ती पहिली झेप
तसच काहीसं तुझ्या डोळ्यात आज साठल होतं
मूक्त, स्वछंद उडण्याच स्वप्न तुझ्या डोळ्यात दिसलं
ते डोंगरावर आलले काळे ढग, त्या काळ्या ढगाणसारखं झालाय तुझसुद्धा
अगदी गच्च झालेत.....तुडुंब भरलेत माझ्या आठवणींनी
ते काळे ढग कसे पावसाच्या सारी पाडण्यासाठी आतुर झालेले असतात
खूप खूप बरसायचे आहे तुलाही, अगदी धुंद होवून जायचे आहे,
अल्हड, अवखळ मुक्तपणे बरसायचे आहे तुला
No comments:
Post a Comment