मन उगी का धावणारे, छळणारे... पळणारे... धुंद वारे अन शहारे, चिंबणारे... गुंतणारे... तिला पाहुनी थांबणारे, स्तब्धणारे... वळणारे... वेड्यागत बेफामणारे, शोधणारे... फसणारे... आक्रंद आक्रंद रडणारे, रूतणारे... दुखणारे... आठवांत त्या फिरणारे, रेंगाळणारे... सावरणारे... आकंठ कधी भरणारे, रमणारे... हसणारे... मन उगी का धावणारे, छळणारे... पळणारे...
No comments:
Post a Comment