माझी मुलगी तीच का ही ? माझ्या पदराला धरून लुटूलुटू मागे येणारी लाघवी गोड हास्याने माझे सर्वांग उत्तेजीत करणारी ... कीती बदललेत ना दिवस ? आज एक मुलगा येणार आहे पहायला ... साडी नाही नेसणार मॅचींग बीचींग नाही पहाणार म्हणतेय तीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला अगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी नेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी पण कायमच्या नाटकाला अता कंटाळली आहे बिच्चारी आणि मी तरी काय करू ? मुलीच्या बाजाराचे स्वागत ही आनंदानेच करु ? अगदी कॉलेजला जायला लागली तेंव्हा ही काळजी वाटायची आणि आता .. आता भिती वाटते.. वाटते उगाच संस्कृतीने असे दिंधोडे काढले आहेत भावनांचे, मनाचे.... आणि शरीराचेही नाही तर काय, उगाच काही ही विचारायचे वरुन खाल पर्यंत स्कॅनिंग करायचे आणि खोट काढायची बस्स .. येव्हडे कष्ट घेतलेत कशासाठी स्वतंत्र विचार करता यावा , स्वताच्या पायावर उभे रहाव यासाठीच ना मग असे वाटते आहे अता का आपणही असे सामिल होतोय या बाजरात आणि बैलाला जसे वेसन बांधुन उभे करतात विक्रीला तसे समाजाच्या, घराच्या प्रतिष्टेचे वेसन बांधुन आपन्च आपल्या मुलीला असे मनातून खच्ची करतोय
No comments:
Post a Comment