Monday, 29 August 2011
Friday, 26 August 2011
Thursday, 25 August 2011
Wednesday, 24 August 2011
बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र
प्रिय अण्णा यांसी,
जय महाराष्ट्र !
एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या सामाजिक व जलसंधारणविषयक कामाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.
सध्या आपण दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराच्या रावणाविरूद्ध जबरदस्त युद्ध पुकारले आहे. रामलीला मैदान म्हणजे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. उपोषणाच्या मार्गाने छेडलेल्या युद्धास देशभरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण अण्णामय झाले आहे.
आपल्या उपोषणाचा आठवा दिवस सुरू झाला आहे व आपली प्रकृती खालावल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण प्राण पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या प्राणावर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या उपोषणाने देश जागा झालाच आहे व सरकारही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या प्रकृतीक़डे पाहून उपोषण सोडा ! उपोषण सोडले तरी आंदोलन सुरूच राहील. आपल्या उपोषण समाप्तीनंतर आपले सहकारी केजरीवाल, बेदी, सिसोदिया वगैरे मंडळींना उपोषणास बसू द्या व आंदोलन चालू राहू द्या.
देशात राजकीय स्वैराचार आणि भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की, शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस महाराष्ट्राच्या नात्याने विनंती करतो आहे की, उपोषण आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा राजकीय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील लढ्यासाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम !
आपला नम्र
(बाळ ठाकरे)
शिवसेनाप्रमुख
प्रेम आणि वेडेपणा...
प्रेम आणि वेडेपणा...
खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि दुर्गुण इकडेतिकडे फिरत होते. काय करावे हे नकळल्याने कंटाळले होते.
एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते'ला एक कल्पना सुचली. ती म्हणाली,"आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली. लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्यामागे लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला.......एक, दोन, तीन..............
वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या ढिगात लपला. 'आपुलकी'नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका तळ्याच्या तळाशी लपला.'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ'एका पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच होता......७९, ८०, ८१, ८२......
बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम' मात्र कुठे लपावयाचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात आपल्यालायाचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम' लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच...९५, ९६, ९७.... शेवटी शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा'ने एका गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला."मी येतोय! मी येतोय!"
'वेडेपणा'न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्याएवढा उत्साह आणि शक्ती त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या तळातून त्याने 'खोटेपणा'ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून काढली. एका पाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा'ने, त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा'ला म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे लपलंय". 'वेडेपणा'ने एक लाकडाचा धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्याफटीतून रक्त ओघळत होतं. प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा'ने त्या लाकडी ढलप्यान प्रेमाच्या डोळ्यांवर वार केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे! मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?
प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता दाखव."
तेव्हापासूनप्रेम आंधळ झालं आणि वेडेपणात्याचा नेहमीचा सोबती झाला.
मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे
Tuesday, 23 August 2011
तू उशीरा येण्याची
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे
घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे
माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे
सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे
रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे
छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे
स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्यात अंतर्धान अस्तित्व माझे
निशिगंधीत चांदणं
आकाशमिठीत गर्द
रात्र ओली शृंगारलेली
नभवेलीवर शुभ्रांकित
निशिगंधीत चांदणं
निशब्द ओठांवरती
पारिजात धुंद
स्वप्नमेघ पालवत
निशिगंधीत चांदणं
ओझरत्या दवबिंदूंमध्ये
कातरलेला चंद्र
शहारलेल्या अंगणी
निशिगंधीत चांदणं
नभी चंदेरी आरास
नीर दर्पण शोभीवंत
झावळीतून शिंपलेले
निशिगंधीत चांदणं
चंद्रसावलीचा प्रदेश
शब्दांध वार्याचा झोत
क्षितिजापल्याड झेपावलेले
निशिगंधीत चांदणं