आपले असावे सुंदर घरटे, आणि मनाची खिडकी असावी चौकोणी तारे त्यातले आपल्याशी नाते सांगणारे.. भाव असावेत प्रिय वर्तुळाकार कधी गतीमान कधी संथ गतीशीलता विचारात यावी वागण्यात चौकोणी संस्काराची चौकट सुरेख असावी परीघावरती लंबाकृती असुद्या स्वप्ने नवी कोणामधुनी सांधतात ती वर्तुळातही नवे नाते चौकोणाच्या सिमा रुंदावतात मग आशेच्या कर्णाने कोणास द्विभागुन जीवणाच्या या प्रवासात सोबती मिळतात अजुन .. वर्तुळाचा व्यास वाढवायचा आपण दिसेल तेथे सलग मैदान गोल वसुंधरेच्या भुपटलावर रमती असे अनेक चौकोण
No comments:
Post a Comment