काही श्वासांचं अंतर…
तुझं माझ्या आसपास वास्तव्य असलं की माझं अस्तित्व तुझ्या असण्यात विरघळू लागतं..
तो वेळ मी तसाच साठवत राहतो माझे शब्द, माझं बोलणं तुझ्या हसण्यात हरवू लागतं..
तुझी लगबग, सावरासावर सारं टिपत राहतो माझं स्वत:चं असल्यागत.. पण दोघांमधलं काही श्वासांचं हे अंतर ओलांडायचं धाडस होत नाही
- आनंदा
Related Posts:
No comments:
Post a Comment