तुझं न येणं ठरलेलंच आहे… त्या दगडावरच्या खोल घळीसारखं… अनं माझं वाट पाहाणंही… त्याच दगडातून उगवलेल्या इवल्य़ाश्या रोपासारखं… किलकिल्या दारातून येणारी झुळूक… घेवून येते तुझाच गंध… घेवून येते मनाच्या गर्ता..अनामिक लाटांच्या भरत्या…. माझं असं डोळे लावून बसणं…..होवून अगतिक… आणि तुझं न येणं….अपरिहार्य…व्यवहार्यही कदाचित … तुझ्या स्पर्शाला पारखे झालेले…अश्रूही… अक्षरश: टपून बसलेले असतात….गनिमासारखे… डोळ्यातल्या हसरेपणातही घेवून फिरते एक भिजला तीळ.. अन् दुखा:त आहे तुझं इंद्रधनुष्य …रंगीत.. काय करू सांग आता तूच… खिडकीतून येणारा प्रकाशाच कवडसा… मंद्रसप्तकातलं एखादं गाणं… तुझ्याच आठवांची बेहोशी घेवून घेते…. बेहिशोबीपणे…..!!!
—- चैताली.
Related Posts:
No comments:
Post a Comment