Wednesday, 23 November 2011

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात….

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात….
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्या आरशामधल्या
पाचफुटी फुला….
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"
अत्तर शिंपडलंय या देखाव्यात"
निर्या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा… !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे…, तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं सोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
विस्कटता , चुरगळता!

Related Posts:

 

No comments:

Post a Comment