.........का नाही कळली मला ..कविता...
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ?
बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्या ..दुसरे काय ..
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त कर्ण्याचे साधन..
की मनात काहीच नाही म्हनुन विचार कर्णार एक चलन
काहीच कळत नाही...
भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ?
की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ?
अस असेल तर काय असत मग ..
वृत्त ..लय .. मुक्तछंध.. ?
मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे
आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात
आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़ट्लेलय .. नियमात
का नाही कळल मला..
आयुष्य .. अन आयुष्याची कविता...
No comments:
Post a Comment