Wednesday, 23 November 2011

उपरा…

उपरा

मी एकटाच होतो अन् तोच बरा आहे
उमगले दोष माझ्याच रक्तात जरा आहे

http://www.kavyasuman.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE/

 

 

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

 

 

http://www.kavyasuman.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/

a

आणी मग बोभाटा गावभर..

आणी मग बोभाटा गावभर..

कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
चोरुनच भेटत राहु आपण
क्षिताजाला आभाळ भेटते ना तसे अगदी
उगाच ढगासारखे भेटायचो
अन पावसात मात्र आपल्यासोबत सारेच भिजायचे
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
मग आभाळात सोडुन, घरात वीजा पडायच्या
आणी नदीला सोडुन डोळ्यांनाच पुर यायचा
उगीच नंतर वाहुन जाण्यापेक्षा
आताच पुल सांभाळायला हवा
नाहीतर पुलावरुन पाणी जयच
आणी मग बोभाटा गावभर..
चारदोन लोक ओळखायचे गर्दीत तुला मला
आणी मग हे चांदणस्पर्शी दिवस
वाळवंटच होऊन जातील

नको वाटतो रे रखरखीत उन्हाळा आता
पावसाच व्यसनच जडलय कोवळ्या वयात
हे व्यसन चोरुनच भोगुयात,
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..

अमॄता__

Related Posts:

Republished by Blog Post Promoter

 

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात….

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात….
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्या आरशामधल्या
पाचफुटी फुला….
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"
अत्तर शिंपडलंय या देखाव्यात"
निर्या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा… !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे…, तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं सोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
विस्कटता , चुरगळता!

Related Posts:

 

Tuesday, 22 November 2011

पुढच्या पावसात,परत मी तुला विचारेल..

पुढच्या पावसात,परत मी तुला विचारेल..

Tuesday, November 15th, 2011 | पाऊस

पुढच्या पावसात,परत मी तुला विचारेल..

पाऊस आला परत
तुला घेऊन परत
आठवणिना जागवून
माझ्या स्वप्नात भिजत भिजत

तुला आठवत
आपण चिंब ओले झाल्यावर

"तू नेहमी माझ्यासोबत राहशील"

अस तू माला वचन मागीतल होतस.
डोळ्यात तुझ्या अश्रू दाटले होते,
तुला आठवत ,मी तुझे अश्रू पुसल्यावर,
तू मला मिठीत घेतल होतस

वाटळ होत
असाच बरसात रहाव पावसाने
या प्रेमात दुबलेल्या रात्रीची,
निर्दयि पहाट कधी व्हावी.
तू आणि मी एवढच विश्व असाव.
तुझ्या डोळ्यात परत
आसवांची लाट कधी ना यावी

आता तळ हातावर पाणी झेलताना जाणवतय
पाऊस तोच आहे,पण थेंब नवे आहेत कदाचित
तुझ्या डोळ्यात जेव्हाही बघतो तेव्हा जाणवत
तुझी आसवे तीच आहेत पण ," कारण " नव आहे कदाचित

बरासनार्या या पावसात
तू ,तुझी स्वप्न आणि
तुझी आठवण आता अनावर झाली आहेत
प्रेम तुझे माझ्यावर आणि माझे तुझ्यावर
तरीही आयुष्याच्या या चक्रव्यूहात,
आपल्यात कसली ही अंतरे झाली आहेत

तो बरसात राहील काही वेळ
आणि निघुनहि जाईल
पण जाताना, तो " तुला "
माझ्या डोळ्यात कायमचा ठेवून जाईल

पुढच्या पावसात
परत मी तुला विचारेल..
तुला आठवत….
आपण….

निशब्द (देव)

Related Posts:



Share आता तरी कळू दे , तुझेच भास सारे, शब्दातूनी वहाते, नियमातली कथारे.

ढाळलेली

Share ढाळलेली आसवं कधी जात नाहीत वाया नव्यानव्याने पालवते झिजलेली काया कातळात फ़ुटतात

ताई रडली

Share ताई रडली तो दिवस ——————————————————– आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच

फ़ुल स्टॉप

Share फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी….. शब्द धरताहेत भोवताली फ़ेर ती

 

प्रेम……….

प्रेम……….

प्रेम……….

प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच 'सेम' असत …….
कधी कवितेत, कधी चारोळीत
उमटलेलं ते एक प्रतिबिम्ब असतं ….

प्रेम म्हणजे वल्गना नव्हे,
प्रेम म्हणजे वासना नव्हे
प्रेम म्हणजे प्रेम असतं
समजायला 'प्रेम' व्हावं लागतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं
रागातही प्रेम असतं
लोभातही प्रेम असतं
चिडण्यात चिडवण्यात प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमच सेम असतं
तिचं त्याच्यावर आणि त्याचं तिच्यावर
एकदम सेम सेम असतं

आईचही प्रेम असतं
बापाचही प्रेम असतं
ते समजण्यासाठी मात्र,
आईबाप व्हावं लागतं ……

Related Posts:

Ipeopel come here:

  • प्रेम

Related ads प्रेम……….

"आजच्या

Share "आजच्या ठळक बातम्या"… पेपर उघडला.. तेच तेच.. एकतर्फ़ी प्रेमातून प्रेयसीवर एसिड फ़ेकले

तू अशी तू

Share तू अशी तू तशीचमचमत्या किनारीची, तु कोरीव चांदणी, गोर्या चेहर्यावर तुझ्या

वर्तुळ आण

Share वर्तुळ आणि चौकोन दोन समान चिन्हांमधला अर्थ वेगळा असु शकतो दोन समांतर

चांदण्या

Share चांदण्या रात्री चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या हाती सख्या तुझाच हात अशी