Thursday 8 September 2011

* ???? Facebook Status *

Blog Entry

http://multiply.com/mu/onlyswapna/image/iG-p3KS1vwzdY6x-t8F8JQ/photos/1M/300x300/18/WOMAN.JPG?et=owb25MacuyFpXgC2Wip%2B4g&nmid=0प्रस्तावना : फेसबुक ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमचा Status म्हणजेच तुमच्या मनात जे काही चालू आहे त्याविषयी थोडक्यात लिहू शकता.पण ह्या status ला ४२० शब्दंमर्यादा आहे.त्यामुळे त्यात मावेल इतकंच तुम्ही लिहू शकता.पण,कवीमनाला हे शब्दंमर्यादेचं बंधन कसं पटेल ?
त्यावरच ही कविता..

**
माझा Facebook Status **

Facebook Status
ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे
आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard
बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले

Status
सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..
Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०

कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?

Facebook
च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली
प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही

म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले
तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status
मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते

तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते

माझे Status तरंगते हिमनग असते..



No comments:

Post a Comment