ही भाषा आहे ओठांची
ओठांच्या कानांसाठी जणू.. दोघंजण..एकमेकांचं ह्रदय प्राशणारे दोन उनाड प्रेमिक..घर सोडलेले ओठांच्या संगमी दोन यात्री जणू.. प्रेम सिध्दांतानुसार दोन ओठांवर आदळून लोपण्यास उचंबळलेल्या दोन लाटा देहाच्या सीमेवर एकमेकांसाठी आतुर दोन इच्छांचे मिलन जणू प्रेमच लिहतंय सुरेख अक्षरांत एक प्रेमगीत जणू,सुंदर चुंबनाक्षरांची ओठांवर अस्तरं एका माळेत गुंफण्यासाठी ओठांच्या दोन जोड्यांवरुन फुलांचं खुडणं ओठांचे हे मधुमिलन म्हणजे स्मितहास्याच्या जोडीची लालचुटूक मधुचंद्र शैय्याच..
No comments:
Post a Comment