Thursday, 8 September 2011

* ?????? *

प्रस्तावना : जग कितीही आधुनिक झाले तरी आजही स्वत:च्या हिंमतीवर,जबाबदारीने स्त्रीने घरचा उंबरठा ओलांडणे खुप मोठी गोष्ट आहे.ह्या अर्थाने की,घराचा उंबरठा हा नेहमी सुरक्षित समजला जातो.आणि तिथेच जर त्या घरातल्या स्त्रीची घुसमट होत असेल तर नवीन पाऊल
उचलण्यासाठी प्रस्थापित परिस्थितीतून बाहेर पडून बाहेरच्या जगातली नवीन आव्हानं स्विकारायला तयार होणे ही तिच्यासाठी खुप मोठी गोष्ट असते.अशाच परिस्थितीतून जाणार्‍या स्त्रीची ही कविता.


**
उंबरठा **


भय अनामिक असे आज दाटून आले..
मेघ अभावित जसे आज दाटून आले..

ओलांडू कशी मी उंबरठा ?

किलकिले दार उघडता
सुख देत हाकारे बाहेरुन आले..

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

घुसमट सोसवेना मनीची
तडफड साहवेना कधीची
कोंडू कशी वेदनेला ?
मारु कशी जाणीवेला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

आहे,जग भयाण आहे
आहे,मीही तयार आहे
माघार घेऊ कशाला ?
दार लावू कशाला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

No comments:

Post a Comment