Friday, 19 October 2012

आईच मातृत्व ...

आईच मातृत्व ...

 

मित्रांनो मी काल एक मराठी सिनेमा पाहिला " मला आई व्हायचंय ....!!!! "

 

मित्रांनो हा चित्रपट तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा माझा हा एक छोटासा प्रयन्त तुम्हाला नक्कीच आवडेल .....

 

ही कथा एका विदेशी महिलेची आणि आपली मराठी महिलेची आहे.ज्यात महेश कोठारे यांची सून प्रमुख भूमिका पार पाडत आहे ( यशोदा ) हिची .

हा सिनेमा असा... एक विदेशी महिला ( मेरी ) हिला मुल होऊ शकत नाही .मग तीन काय करायचं म्हणुन येशू ( यशोदा ) हिची पोटी टेस्ट टयूब च्या साह्याने बेबीच रोपण केल जात .नऊ महिने ती त्या बाळाला पोटात वाढवते .पण त्या आधी एक वळण या कथेला अस की , बाळ कस आहे हे पाहिलं जात थोडक्यात सोनोग्राफी .यात अस दिसून येत की बाळ हे अपंग आहे मग मेरी हा विचार करते की अस बाळ नको म्हणुन मेरी येशूला बोलते की हे बाळ अनाथ आश्रमात ठेव म्हणुन .बघा किती कठोर आहे आईच काळीज पण येशू ह्या गोष्टीला तयार होत नाही ती या गोष्टीला साफ नकार देते आणि तिला बोलते काहीही असो मी याला जन्म देऊन त्याचा सांभाळ करेल आणि आपल्या निर्णयावर ठाम राहते .येशूला आधी एक मुलगी असते ती आधीच आजाराने हैराण त्यात हे अस पण घेतलेला निर्णयावर ठाम राहून जीवन जगत असते .अश्यातच ती एका गोंडस बाळाला जन्म देते .ओह्ह त्या बाळाला कोणाची नजर लागो .कारण जे बाळ जन्माला आलं ते एकदम जस डॉक्टर बोलले होते त्याच्या विरुद्ध .एकदम त्याला कोणता त्रास नाही काही व्यंग नाही अस .

 

काही दिवसातच त्या बाळाच नाव ठेवल जात ( माधव ) माध्या....एकदम सुरेख .या नावाप्रमाणे तो पण दिसायला सुंदर होता .सोनेरी केस ,एकदम गोरा ,निळे डोळे ...एकदम मस्त त्याच वर्णन कारण अवघड आहे .गणप्या त्याचा मामा ...थोड काही झाल कि त्याला सायकल वर घेऊन फिरायचा येशू ने मारलं तरी लगेच गणप्या मामा त्याला सांभाळायचा .लय लळा लावला पोट्याने .नजरे आड जरी झाला तरी सर्वांच्या काळजात कालवा कालव व्हायची ...कारण त्याने हृदयात अस काही घर केल होत कि तो दूर जाने ही संकल्पना मानत येत नव्हती ....

 

आईचा बोट धरून चालणारा माध्या कधी रडताना दिसला नाही पण येवड्याश्या लेकराचा येशू वर खूप जीव असायचा .तो येशूला विचारायचा कि मी इतका गोरा कसा काय ??? माझे डोळे निळे ,केस सोनेरी कस काय तर येशू त्याला बोलायची एक परी होती दूर देशातली तिने मला एक चांदणी मला दिली आणि मला म्हंटली कि हे तुझ्याकडे ठेव मग मी ती चांदणी माझ्याकडे ठेऊन घेतली आणि ती चांदणी म्हणजे तू ........

काय मिलाप साधला होता परी आणि चांदणी याचा .... हे सांगत असताना त्याचा हातात एक कॉमिक पुस्तक होत तो ते पाहत होता आणि पाहता पाहता झोपी गेला . दुसर्या दिवशी त्याचा एक मित्र त्याला ओरडत येतो आणि म्हणतो माध्या तू माझ कॉमिक पुस्तक मला विचारता का आणलस तर त्यावर माध्या बोलला तू मला ते पुस्तक देत नव्हता म्हणून मी आणलं पण मी चोरी न्हाय केली . हे पाहताच येशू त्याला काठीने मारू लागली आणि म्हणू लागली चोरी करतोस हा ... त्यावर तो बोलला मी चोरी नाही केल .मी पुस्तक ह्यासाठी आणलं होत कारण त्यात विमानच चित्र होत म्हणून अस बोललेलं पाहताच येशू च्या डोळ्यातून खळाळून पाणी आल .मित्रांनो हे दृश्य पाहताना माझ्याही डोळ्यात पाणी आल इतक्यात गणप्या तिथे आला आणि येशूला ओरडू लागला का मारालीस लेकराला .... त्याची समजूत काढली आणि त्याला सायकल वर बसून एक मस्त पैकी रपेट मारली आणि माध्या खुश ... पोराची ही विमानात बसायची इच्छा पाहून येशूने गनप्याला त्याच्या साठी एक कॉमिकच पुस्तक आणायला पैसे दिले .आणि त्याला मायेने जवळ घेतलं आणि आईला रडताना पाहून ते लहान लेकरू आईचे ओले डोळे पुसू लागला .... हे दृश्य पाहत असताना माझ मन इतक गहिवरून आल कि त्याची प्रतिक्रिया मला अजूनही करता येत नाहीये .असो नंतर मग एकदा ते बाजारात गेले फिरायला ( मित्रांनो इथे खरा एका आईची आणि एका लेकराची जेव्हा ताटातूट होते तेव्हा जि भावमुद्रा चेहेर्यावर दिसते ती पाहिली असता कोणतीही व्यक्ती डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही ) .जत्रेतल्या पाळण्यात फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर खरेदी करताना त्याच्यासाठी बरीच काही खेळणी घेतली आणि त्याने विमान घेण्याची मागणी केली आणि तिने घेतलं पण आणि पैसे देत असताना ते लहान लेकरू म्हणत आई येवडेच पैसे राहिले का तुझ्याजवळ ??? किती हळहळ वाटली असेल त्या येशूला लेकरासाठी तिने मागचा पुढचा विचार नाही केला फक्त पोराला काहीही कमी पडू द्यायचं नाही म्हणून .पण त्याहून पुढची अशी गोष्ट कि ते विमान तिथच ठेवलं आणि आईचा हात धरून तिला ओड्त एका बांगडी वाल्याच्या दुकानाजवळ नेल आणि त्या दुकानदाराला म्हंटला कि काका माझ्या आईला या लाल रंगाच्या बांगड्या हातात भरा ना .... किती लहान वयात या मुलाला आईची काळजी होती .अस म्हणतात ना आपल्या सुखासाठी कोणी प्राणाची शर्थ करत असेल तर तेव्हा आपणही त्याची जाण ठेवावी पण हे त्या मुलाला लहानपणी कळत होत .हातात बांगड्या भरत असताना दुकानदार म्हंटला ताई पोराचा लय जीव हाय तुझ्यावर ....  हे म्हणताच येशूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आनंदाश्रू  डोळ्यातून वाहू लागले .

पुढे काही अंतरावर गेल्यावर येशू हातावर नाव गोंदून घेत होती आणि त्याचा वेदना तिला होत होत्या .आणि तिला वेदना होत आहे हे पाहून मध्य तिला म्हणतो दुखत आहे तर नाव कशाला काढत आहे नको काढू ना नाव मग ...ती तरी दुर्लक्ष करते आणि नाव गोंदून घेते .इतक्यात माध्याच लक्ष्य एका दुकानाकडे जात आणि तितेच हरवतो .आणि रडू लागतो आणि इकडे येशू शेजारी बघते तर माध्या काही दिसत नाही नाव गोंधनारया इसमाचा हात ती झिडकारत पिशवी उचलून त्याला शोधायला लागते .मित्रांनो हे दृश्य मला सांगताना खरच माझं मन इतक हेलावल की मला डोळ्यात अश्रू आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता . माध्या आईला इकडे तिकडे शोधू लागतो पण आई कुठेच दिसेना यामुळे अजूनच मोठ्या मोठ्याने रडू लागते इकडे हीच अवस्था येशू ची झाली होती कुठे असेल लेकरू या कारणाने ती इकडे तिकडे शोधत होती .अचानक माध्याच्या चार इसम येतात आणि त्यांना पाहून अजून तो मोठ्याने रडू लागतो आणि तिथून पळत सुटतो .आणि एका मदत केंद्राजवळ येऊन बसतो तिथे एक व्यक्ती त्याला त्याच्या जवळ येऊन त्याला खुर्चीवर बसवते आणि आपण आईला शोधू अस बोलून तो माणूस लाउडस्पीकर वर एक मुलगा हरवला आहे त्याच कोणी नातेवाईक  असतील तर मदत केंद्राशी संपर्क साधा अशी घोषणा करतो आणि ते ऐकताच येशू तिकडे धाव घेते आणि तिथे येते माध्याला पाहून ती खूप रडू लागते .माध्या करंगळीच एक बोट वर करून तिच्या जवळ जातो आणि इतक्या मोठ्याने रडतो आणि म्हणतो पसरत अस कुठे जाणार नाही .येशू त्याला छातीला कवटाळून रडू लागते .मित्रांनो आईची आणि लेकारची ही ताटातूट झाली तर काय अवस्था होते आणि ती पाहणे खरच हे व्यक्तच करता येत नाहीये .

 

मित्रांनो या चित्रपटाचा उर्वरित भाग मी उद्या जरूर व्यक्त करेल कारण मला हे व्यक्त करण अवघड होतंय .....

 

वेळ आहे ती मध्यांतराची .... तेव्हा उद्या नक्की भेटू .... 

 

तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल .मित्रांनो जर यात माझ्या काही चुका झाल्या असतील  तर त्या तुम्ही सांभाळून घ्या .

 

--
Thanks & Regards

Rushikesh Kedari
AryaOmnitalk Wireless Solution Pvt.Ltd.Pune

Phone.No:- 9604895925/9503277966

 

No comments:

Post a Comment